Monday, June 17 2019 4:19 am

कोकणातल्या प्रकल्पाला काही राजकीय नेत्यांच्या विरोध -आशिष शेलार

ठाणे-: कोकणाचा विकास खुंटब्याचा पर्यंत काही राजकीय पक्ष करीत असून मुद्दामून कोकणच्या प्रकल्पाला काही राजकीय नेते विरोध करत आहेत, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न घेता सेनेला लगावला. कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमाला आशिष शेलार ठाण्यात आले होते त्यावेळी त्यानी हे विधान केले. दरम्यान कोकणी माणसांना भुलवण्याचे काम सुरू आहे, असे देखील मत यावेळी शेलार यांनी मांडले.
             कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने ठाण्याच्या शिवाई नगर येथे मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 21 वर्ष असुन विविध मान्यवर या कार्यक्रमाला भेट देत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणाचा विकास हाती घेतला आहे. लवकर कोकणातील रेल्वेच्या दळणवळणासाठी दोन ट्रॅक चे काम पूर्ण होणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. कोकणातल्या माणसाचे गेल्या 20 वर्षाचे स्वप्न हे भाजप सरकार पूर्ण करीत असुन कोकणी माणसाने भाजप सरकारला पाठिंबा दिला असल्याचे शेलार यांनी सांगितले.
         दरम्यान व्यावसायिकांनी चालना मिळावी यासाठी अश्या मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन कोकणातल्या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी तसेच येथे मिळणारे उत्पन्न थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याने या महोत्सवाचा हेतू असल्याचे यावेळी आयोजन सीताराम राणे यांनी बोलताना सांगितले.