Tuesday, December 1 2020 12:57 am

कोंरोना झाले हजार पार ठामपा आरोग्य विभागात गोंधळ-पालिका आरोग्य अधिकारी हटाव  मोहीम झाली सुरू !

ठाणे : ठाणे पालिकेच्या हद्दीत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्याने ठाण्यात फोफावणार कोविड-19 ला आळा घालण्यात पालिका प्रशासनाला आरोग्य विभागाच्या सावळागोंधळ आणि मनमानी कारभार तसेच स्पर्धेमुळे स्पष्ट अपयश आले आहे. पालिकेच्या आरोग्यक विभागात सध्या वरिष्ठ अधिकारी झालेत गायब आणि ज्युनिअर झालेत साहेब अशी अवस्था असल्याने कारभाराच्या तीनतेरा वाजल्या आहेत. तर उंटावरून शेळ्या हकणारे सेवानिवृत्त झालेले माजी वैद्यकीय अधिकारी आर.टी. केंद्रे फॉर्म्युला फोल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मे रोजी रुग्णांचा आकडा नव्या 60 वर होता तर रुग्णांची संख्या 611 होती. 10 मे रोजी नव्या रुग्णांचा आकडा 41होता तर रुग्णांची संख्या 671 होती. 11 मे रोजी नव्या रुग्णांचा आकडा 40 होता तर रुग्णांची संख्या 752 एवढी होती. 12 मे रोजी नव्या रुग्णांचा आकडा 44 होता. तर एकूण रुग्णांचा आकडा 796 होता. 13 मे रोजी नव्या रुग्णांचा आकडा 47 होता तर एकूण रुग्णांचा आकडा 843 होता. तर अचानक 14 मे रोजी नव्या रुग्णांचा आकडा दुपट्टीने वाढला आकडा 70 वर गेला तर 15 मे रोजी रुग्णांचा आकडा 83 वर आला. त्यानंतर 16 मे रोजी रुग्णांचा आकडा 94 वर पोहचला तर ठाण्यात कोरोना रुग्णांची एकूण संध्या हजार पार गेला. वाढीत रुग्णांची संख्या पाहता ठाणे कोरोनाचे हब होत चालला असल्याचे संकेत मिळत आहेत.

वैद्यकीय अधिकारी माळगावकर हटाव मोहीम ठामपात सुुरु

ठाण्यात कोरोनाचे रुग्णांवर रुग्ण वाढत असतानाच विशेष अधिकारी म्हणून आर.टी. केंद्रे याना सेवेत तात्पुरत्या स्वरूपात सामावून घेतले आणि पालिका आरोग्य विभागात पदासाठी धडपड सुरू झाली. ज्युनियर आणि अन्य अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी बनण्यासाठी चक्क वैद्यकीय अधिकारी डॉ. माळगावकर हटाव मोहीमच सुरू केली आहे. यामुळेच आरोग्य विभागात असहकार्याची भूमिका वाढली आणि कोरोनाचे हॉटस्पॉट वाढले. एक चांगल्या अधिकारी याला कुठलाही राजकीय लागेबांधे नसल्याने उचलून फेकण्याचा हालचाली सुरू झाल्या होत्या. या मोहिमेत आर.टी.केंद्रे आणि डॉ. राणी शिंदे या आघाडीवर असल्याचे सूत्रांची माहिती आहे.  तर पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. माळगावकर हे कर्तव्यावर असताना त्यांच्या पदाचा अधिकार घेऊन डॉ. राणी शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून पालिकेच्या दस्तावर सह्याही केल्याचे समोर आले आहे. पालिकेतील या स्पर्धेत ठाणे मात्र कोरोनाचे हब होत चालले आहे.