Monday, June 1 2020 1:27 pm

केंद्र सरकारची व्हॉट्सअँपवर कडी नजर

बेंगळुरू :- फेसबुकची मालकी असणाऱ्या  व्हॉट्सअँपच  गैरवापर होऊ नये यासाठी व्हॉट्सअँपवर मेसेज धाडणाऱ्या वापरकर्त्याच्या बोटांचे डिजिटल ठसे जतन करून ठेवण्याची यंत्रणा विकसित करावी, अशी सूचना केंद्र सरकारने व्हॉट्सअँपला केली आहे.

व्हॉट्सअँपवरून कोणताही गुन्हा होऊ नये व त्याचा गैरवापर होऊ नये या साठी केंद्र सरकार प्रयत्नशील असते. व्हॉट्सअँप वर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक मेसेजचा उगम शोधून काढणे यामुळे शक्य होईल, असे सरकारचे धोरण आहे.
भारतात व्हॉट्सअँपचे २० कोटी पेक्षा जास्त युजर आहेत. या माध्यमाच्या गैरवापराचे प्रमाणही वाढते आहे. व्हॉट्सअँपवरून चुकीची माहिती किंवा अफवा वेगाने पसरण्याच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअँपने सुरक्षात्मक कठोर उपाययोजना कराव्यात अशा सूचना सरकारकडून सातत्याने केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक मेसेज धाडणाऱ्याच्या बोटांचे डिजिटल ठसे जपून ठेवण्याची सूचना सरकारने व्हॉट्सअँपला केली आहे.
या घडामोडींबाबत प्रतिक्रिया देण्यास व्हॉट्सअँपने  नकार दिला. यूजरने धाडलेले मेसेज हे गोपनीय राखण्याचे व्हॉट्सअँपचे धोरण आहे. याचा अर्थ एखाद्याने धाडलेला मेसेज हा ती व्यक्ती व ज्याला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तिव्यतिरिक्त कोणालाही पहाता येत नाही. या व्यक्तींच्या संमतीशिवाय अन्य व्यक्तींना तो मेसेज पहाता येत नाही. केंद्र सरकारला मात्र यात बदल अपेक्षित आहे. माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रस्तावित बदलांसंबंधीचा मसुदा गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार एखाद्या मेसेज वा माहितीचा उगम शोधून काढण्याची अपेक्षा सर्व इंटरनेट माध्यमांकडून सरकारने व्यक्त केली आहे.

.