Wednesday, February 26 2020 9:23 am

कुस्तीच्या सरावासाठी लवकरच स्वतंत्र संकुल उपलब्ध करणार : एकनाथ शिंदे पैलवान मारुती जाधव व सृष्टी भोसले ठाणे महापौर चषकचे मानकरी

ठाणे  : ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा ही  अतिशय लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ठाणे महापालिका ही राज्यांत नव्हे तर खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारी देशातील पहिली महापालिका आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी बक्षीसामध्ये वाढ करण्यात आली  आहे. कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय  महापौर  नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे, याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असून सदरचे संकुल लवकरच  उभारण्यात येईल अशी जाहीर घोषणा राज्याचे नगर विकासमंत्री व ठाणे जिल्याचे पालकमंत्री एकनाथ ‍शिंदे यांनी ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी केली. यावेळी पुरूष गटात ठाणे महापौर चषक चा मानकरी ठरलेल्या पैलवान मारुती जाधव व महिला खुला गटातून विजेती ठरलेली सृष्टी भोसले ‍यांना सन्मानित करण्यात आले.

महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ठाणे महापौर कला क्रीडा महोत्सवातंर्गत ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा आर्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास महापौर नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, माजी महापौर स्मीता इंदुलकर, नगरसेवक सुधीर कोकाटे आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा अधिकारी  मीनल पालांडे आदी ‍ उपस्थीत होते.

या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-या मारुती जाधव यांना 1,25,000/- चे रोख पारितोषिक तर दिव्तीय पारितोषिक सिकंदर शेख यांना 75,000/- रोख , तृतीय पारितोषिक सुहास गोडगे यांना 60,000/- रोख तर चतुर्थ  पारितोषिक बाला रफीक शेख यांना 40,000/- रोख देवून गौरविण्यात आले.‍

महिला केसरी गट या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविणा-या सृष्टी भोसले यांना 75,000/- रोख, दवितीय पारितोषिक मनिषा दिवेकर यांना रोख 40,000/- , तृतीय पारितोषिक प्राजक्ता पानसरे यांना 20,000/- रोख तर चतुर्थ पारितोषिक भाग्यश्री भोईर यांना 10,000/- रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

महिला जिल्हास्तरीय स्पर्धेत  70 किलो वजनी गटात प्रथम पारितोषक रु 7500/- रोख, दवितीय  पारितोषि क भाग्यश्री भोईर यांना रु. 5000/- रोख, तृतीय व चतुर्थ पारितोषिक विजया पाटील  व भाग्यश्री गटकर  यांना प्रत्येकी 3000/- रोख देवून गौरविण्यात आले. ‍

विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना देखील  पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.