Monday, January 27 2020 1:57 pm

कुत्रा चावल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद :-  रस्त्यावरील भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने  दोन वर्षांच्या चिमुकलीचा  मृत्यू झाल्याची घटना  औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली.  अक्षदा वावरे असे या दोन वर्षाच्या  चिमुकली चे नाव असून कुत्र्याने चावा घेतल्यावर उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला.

दोन वर्षाची अक्षदा हि अंगणात खेळत असताना परिसरातील एक भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हाल केला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

नागरिकांकडून महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारही करण्यात आली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या हलगर्जीपणा वावरे कुटुंबीयांच्या दुःखाला कारणाभूत आहे.