Saturday, January 18 2025 5:03 am
latest

किसन नगरमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर गाळून व उकळून करावा

ठाणे, 23 – मुंबई महापालिकेच्या भुमिगत जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम दिनांक २०/१/२०२३ पासुन हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातील किसननगर नं १,२ व भटवाडी परिसरात मुंबई महापालिकेमार्फत होणारा पाणी पुरवठा जल शुध्दीकरणाची प्रक्रिया न केलेल्या स्वरुपाचा होईल. तरी नागरिकांनी पिण्याचा पाण्याचा वापर गाळून व उकळून करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात काही विभागात बृहन्मुंबईकडून पाणीपुरवठा होतो. भांडुप येथे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे सदरचे काम हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील काही दिवस प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. तरी ठाण्यातील किसननगर 1, 2 व भटवाडी विभागातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणुन पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी गाळून व उकळून घेण्यात यावे महापालिकेच्यावतीने कळविण्यात येत आहे.

तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.