Thursday, November 21 2019 3:43 am

कारागृहातून फरार झालेल्या आरोपीला ७ वर्षानंतर यूपीतून अटक

ठाणे : प्रेयसीची हत्या केल्या प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आरोपी सुमित ब्रिजबिहारी गिरी हा कारागृहातून पेरोल सुट्टीवर आला आणि कारागृहात न परतता फरार झाला. या फरार आरोपीला ७ वर्षानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने उत्तर प्रदेश बलिया येथून अटक केली.

२० मार्च,२००८ रोजी हद्दीत आरोपी सुमित ब्रिजबिहारी गिरी याची प्रेमिका संमता फर्नांडिस हिला अनिकेत लॉजमध्ये रम ३०२ राहत असताना प्रेमातून निर्माण झालेल्या नैराश्येतून आरोपी सुमित याने प्रेयसीच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर धारदार चाकूने वार करीत हत्या केली. राबले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सुमितला अटक केली. न्यायालयाने दोषी ठरवून सुमितला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सुमित हा कोल्हापूर येथील कळंब कारागृहात शिक्षा भोगत होता. २३ नोव्हेंबर रोजी आरोपी सुमित गिरी याने पेरोलवर कारागृहाच्या बाहेर आला. त्याला पुन्हा कारागृहात २२ डिसेंबर,२०१२ रोजी पुन्हा येणे गरजेचे होते. मात्र सुमितने पोबारा करीत उत्तरप्रदेश येथील बलिया गावात अस्तित्व लपवून राहू लागला. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने राबले पोलीस ठाण्यात आरोपी सुमित फरार झाल्याचा गुन्हा १३ नोव्हेंबर २०१३ रोजी दाखल केला. दरम्यान गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाला आरोपी सुमित गिरी हा बलिया या मूळगावी राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस उत्तरप्रदेशात पोहचले. त्यांनी उत्तर प्रदेशातील विशेष टास्क फोर्सच्या मदतीने अखार बालिया येथून ताब्यात घेतले. सुमित गिरी याची पुन्हा ७ वर्षांनी कल्पहापूर कारागृहात रवानगी करण्यात आली.