Saturday, September 18 2021 12:25 pm
ताजी बातमी

कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी सायंकाळी आग !

मुंबई-: कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. आग लागताच कारखान्यातील कामगार बाहेर पळाले. चार फायर इंजिन आणि टँकर्सच्या मदतीने सुमारे दीड तासांत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. आजूबाजूला वेल्डिंगचे काम सुरू असल्याने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, आगीचे नेमके कारण अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

सदर घटनास्थळी मुंबई अ.दलाची 4 फा.वा आणि 4 जम्बाे वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहन, 2 रुग्णवाहिका उपस्थित होत्या. सदरची आग 22:32 वाजता पूर्णपणे विझवण्यात आली. सदरच्या घटनेत 4 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  राजू विश्वकर्मा (पु/वय 30 वर्ष), राजेश विश्वकर्मा (पु/वय 36 वर्ष), भावेश पारेख (पु/वय 51 वर्ष), सुदामा लल्लनसिंग (पु/वय 36 वर्ष) असे मृत व्यक्तींची नवे आहेत.