Friday, May 24 2019 9:33 am

काँग्रेसचे तीन माजी खासदार पुन्हा रिंगणात..

मुंबई : आगामी निवडणुकीत काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची  नावे आहेत. लोकसभेच्या उमेदवारी साठी  पुन्हा उतरण्याची इच्छा नसलेल्या काँग्रेसच्या तीन माजी खासदारांच्या नावांची  यादीत समावेश झाला आहे. प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे आणि मिलिंद देवरा पराभवाचा वचपा काढण्यासाठी रणांगणात उतरणार आहेत. सोलापूरच्या पारंपरिक मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवणार आहेत. सोलापुरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत  यांना सोलापुरात पराभवाचा धक्का बसला होता . गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडेंनी शिंदेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर लोकसभेच्या आखाड्यात पुन्हा न उतरण्याचा निर्णय  सुशीलकुमार शिंदेंनी  केला होता. मात्र सोनिया गांधींच्या आर्जवानंतर ते राजकीय पुनरागमन करण्याच्या बेतात आहेत.
2009 च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंनी 99 हजार 632 म्हणजेच जवळपास लाखभर अधिक मतांनी बनसोडेंना पराभूत केलं होतं. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याच शरद बनसोडेंनी सुशीलकुमारांना दीड लाखांच्या मताधिक्याने हरवलं. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता सुशीलकुमार उत्सुक असतील.
 अशातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपला बालेकिल्ला म्हणजेच अकोला सोडून सोलापुरातून शड्डू ठोकण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणी वाढल्याचं मानलं जातं.