Friday, December 13 2024 11:48 am

कशेळी गोळीबारातील म्होरक्या साथीदारांसह जेरबंद; वागळे इस्टेट गुन्हे युनीटची कामगिरी

ठाणे, ३ : मयत गणेश कोकाटे यांच्याकडून २०१४ मध्ये एका गुन्ह्यात अपमानास्पद वागणूक मिळाली होती. त्याचा राग मनात धरून त्यांची गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली म्होरक्या धनराज उर्फ धन्या तोडणकर (३३) आणि त्याचा साथीदार संदिपकुमार सोमेलाल कनोजिया (२७) यांनी पोलिसांना दिली. तसेच तोडणकर यांच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषीत केले आहे. तसेच गुन्ह्यानंतर ते महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्या दोघांचा ताबा नारपोली पोलिसांकडे दिला जाणार आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कशेळी गावाचे कमानी जवळ ८ डिसेंबर २०२२ रोजी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरी जाताना गणेश कोकाटे यांच्यावर त्या दोघांकडून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये कोकाटे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू होता. दरम्यान वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनीटला तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण मध्ये या गुन्हा हा धनराज उर्फ धन्या तोडणकर व त्याचा एक साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांचा शोध घेत असताना, गुन्हे शाखा, घटक ५ चे सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे यांना मारेकरी मंगळवारी सकाळी ठाण्यातील इंदिरानगर नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्या दोघांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तोडणकर हा ठाण्यातील इंदिरानगरचा तर संदीपकुमार हा उत्तरप्रदेश,
सुलतानपुर येथील रहिवासी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कामगिरी गुन्हे शाखा वागळे घटक – ५, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरिक्षक शिवाजी कानडे, सहायक फौजदार सुनिल अहिरे, पोलीस हवालदार जगदीश न्हावळदे, विजय काटकर, अजय फराटे, संदिप शिंदे, विजय पाटील, माधव वाघचौरे, सुनिल रावते, शशिकांत नागपुरे, रोहिदास रावते, सुनिल निकम, पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, पोलीस कॉन्स्टेबल अमोल इंगळे, यश यादव, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी मोहिते व सुनिता गिते या पथकाने केली आहे.

……..