Monday, May 12 2025 5:48 pm

कळव्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

ठाणे, 07 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रस्ता मिळावा, यासाठी सुमारे 25 हजार ठाण्यातील रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलानातील राहिवाश्यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असताना, रविवारी कळवेकरांनी अनधिकृतपणे बांधलेली व्यायामशाळा पाडून आम्हाला न्याय द्या अन्यथा आमचा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार असे जाहीररीत्या बॅनर लावून म्हटले आहे. तसेच अनधिकृत व्यायामशाळा पुनर्बाधणीचा घाट घालणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. दरम्यान तो बॅनर पोलीस बंदोबस्तात महापालिकेंकडून काढण्यात आला.
ठाण्यातील कळवा परिसरात जुना बेलापूर रोड येथे असणारी धर्मवीर आनंद दिघे व्यायाम शाळा ही जय त्रिमूर्ती सोसायटीचा एक भाग होता. परंतु महापालिकेने त्या व्यायाम शाळेला 2013 अनधिकृतरित्या घोषित करून टाळे लावून बंद केली होती. त्याच्यानंतर काही वर्षांपूर्वी या व्यायामशाळेला महापालिकेने सील देखील लावले होते. परंतु या व्यायामशाळाचे मुख्यमंत्री सहायता निधीतून पुनर्बाधणीचा घाट घातला जात असल्याची बाब लक्षात येत, तेथील नागरिकांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या या मनमानी कारभार बॅनर लावून जाहीर निषेध नोंदवला. तसेच अनधिकृतपणे बांधलेली व्यायामशाळा पाडून आम्हाला न्याय द्या अन्यथा आमचा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार असल्याचे म्हटले आहे. त्या बॅनरवर जय त्रिमूर्ती सहकारी गृह निर्माण संस्था, कळवा, ठाणे असे ही नमूद करण्यात आले. हा बॅनर लावल्यानंतर काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात तो निषेध लावलेल्या बॅनर काढला आहे.
………