Saturday, April 26 2025 1:16 pm

कळवा वॉटरफ्रंट परिसराची अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केली पाहणी

ठाणे (१९) : कळवा खाडी किनारी असलेल्या वॉटरफ्रंट येथे दुरावस्था झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अतिरीक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी यांनी बुधवारी सकाळी या परिसराची पाहणी केली.

उड्डाणपुलावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पुलाखाली चिखल झाला आहे. उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी पाईप दुरुस्तीच्या सूचना श्री. माळवी यांनी दिल्या. तसेच, वॉटरफ्रंटचा परिसर स्वच्छ करून त्याची निगा राखली जाईल. नागरिकांना फेरफटका मारताना असुविधा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. माळवी यांनी दिल्या आहेत.