Monday, March 24 2025 6:06 pm

कळवा येथे १७ ते १९ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन

ठाणे – १५ मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर 3 वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन आयोजन करण्याचा मान मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाला मिळाला असून हे संमेलन दि. 17,18 व 19 डिसेंबर 2022 या कालावधीत सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा-ठाणे येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते शनिवार 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सहकार विद्यालय कळवा- ठाणे येथे होणार आहे. या बालविज्ञान संमेलनात महाराष्ट्रातील सुमारे 120 विद्यार्थी व 30 शिक्षक सहभागी होणार असून आपापले प्रयोग/ प्रकल्प सादर करणार आहेत. त्यातून पारितोषाकासाठी प्रकल्प निवडले जाणार आहेत. या संमेलनात विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या संमेलनात मध्यवर्तीचे अध्यक्ष डाॅ. ज्येष्ठराज जोशी, ठाणे विभागाचे अध्यक्ष दा.कृ.सोमण, श्री. पाचपांडे, श्री.मकरंद जोशी, श्री. हेमंत मोने, डाॅ. जान्हवी गांगल, डाॅ. टेकाळे श्रीमती पुष्पलता डुंबरे, श्री. अ. पा. देशपांडे, श्री. ना.द. मांडगे , डाॅ. अमोल भानुशाली इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नेहरू सायन्स सेंटरतर्फे प्रयोगही सादर केले जाणार आहेत सोमवार दि. 19 डिसेंबर रोजी विज्ञान सहल आयोजित केली असून त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने चार बसेसची व्यवस्था केली आहे. या विज्ञान सहलीत मुलुंड येथील केळकर काॅलेजमधील प्रकल्प व ओवळा ठाणे येथील फुलपाखरू उद्यानाला भेटी आयोजित केल्या आहेत.