Friday, December 13 2019 8:04 am

कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

कल्याण :-   कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचं आज  स्वाईन फ्ल्यू च्या आजाराने  निधन झाले.  स्वाईन फ्ल्यू आजार झाल्याचे समजताच  गेल्या १५ दिवसांपासून  कल्याणी पाटील या  ठाण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या परंतु अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   कल्याणी पाटील या   २०१३ ते १५ दरम्यान त्या  कल्याण-डोंबिवलीच्या महापौर होत्या. २०१५मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासुरु असतानाच तीन चार दिवसांपूर्वी  त्यांची प्रकृती बिघडली. त्या उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आज दुपारी 1.21 मिनिटांनी कल्याणी पाटील याचं दुःखद निधन झाले असून त्यांचा राहत्या घरातून सायंकाळी 7.00 अंत्ययात्रा निघाली.