Tuesday, July 7 2020 2:04 am

कल्याण-अहमदनगर रोडवर भीषण अपघात

जुन्नर-: काल रात्री कल्याण-अहमदनगर रोडवर गायमुखवाडी ( पिंपरी पेंढार)येथे अहमदनगर हून येणारी डॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक मोठा अपघात झाला. या अपघाताच्या धडकेनंतर वाहनांनी जोरदार पेट घेतली. स्थानिकांनी आग आटोक्यात आणली परंतु दोन्ही वाहणे जेसीबीच्या साह्याने अलग करावी लागली. प्रसंगी घटनास्थळी 2 जण ठार तर 10 जण गंभीर असून 37 विध्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत . त्यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.