नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन.
ठाणे(१०) : ठाणे महापालिका हद्दीतील जे करदाते सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जून,२०२२ पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे,याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवार दिनांक 11 जून, २०२२ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.०० तसेच रविवार दिनांक 12 जून, २०२२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वितरीत करण्याचे काम प्रभागसमिती स्तरावरुन सुरू आहे. जे नागरिक १५ जून पर्यत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १६ जून ते ३० जून, २०२२ पर्यंत ४ टक्के, १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत ३ टक्के तर १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत जमा करु शकतील. तसेच सदर सवलत योजनेकरिता करदात्यांचा प्रतिसाद पाहता करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे,याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवार दिनांक 11 जून, २०२२ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.०० तसेच रविवार दिनांक 12 जून, २०२२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.