Tuesday, June 2 2020 3:14 am

कर्नाटक बरोबरच मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेसची परिस्थिती बिकट;काँग्रेस हाय अँलर्टवर

नवी दिल्ली :-  कर्नाटक आणि गोव्यात काँग्रेस पक्षाची हालत पाहता  मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस हाय अँलर्टवर आहे.  मध्य प्रदेश आणि राजस्थानात अतिशय कमी फरकाच्या बहुमताने काँग्रेसची सरकारे आहेत. या  राज्यांमध्ये सरकारांचे अस्तित्व काही अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. कर्नाटक आणि गोवा सोबतच  मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यात भारतीय जनता पक्षाची नजर असल्याची चाहूल काँग्रेसपक्षाला लागली असून मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि इतर नेते सावध असून केवळ विरोधकांच्या हालचालींवरच नाही, तर आपल्या आमदारांवरही त्यांचे बारिक लक्ष असल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटक आणि गोव्यात ज्या प्रकारे आमदारांना फोडले जात आहे, ते पाहता हा प्रकार जुन्या ऑपरेशन लोटसमध्ये वापरण्यात आलेल्या पद्धतीपेक्षाही पुढचा असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वरून ‘नवा भाजप’ आपले लक्ष्य गाठण्यासाठी अशा प्रकारचे अपारंपारिक राजकीय हत्यारांचा वापर करत कोणत्याही थराला जावू शकतो असे काँग्रेसला वाटत आहे. गोव्यातील ख्रिश्चन धर्मीय आमदार भाजपबरोबर आहेत. या वरून बहुसंख्येने ख्रिश्चन असलेल्या राज्यात भाजपने पारंपरिक सामाजिक विषमतांचा फायदा घेण्यासाठी कशा प्रकारे काम केले असेल याचा अंदाज येतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.