करोना सारख्या महामारीत नववी व दहावीला एकही दिवस शाळेत जाता आले नाही. त्याच वेळी एप्रिल 2021 मधे दमछाक व सुक्या खोकल्या मुळे दिव्या त्रस्त होती कोरोना ची चाचणी केली असता ती negative आली त्यानंतर ct scan केल्यावर (t cell lymphoma)कर्करोगाचा अंदाज व्यक्त केला. हे सर्व कोरोना च्या दुसऱ्या लाटेत आमचा वाकळवाडी ता.राजगुरुनगर, पुणे येथे झाले व ct scan च्या report नंतर संपूर्ण कडक lockdown असताना ठाण्यामध्ये jupiter hospital येथे admit केले व त्या वेळी कॅन्सर चे उपचार चालू झाले १० दिवस jupiter च्या icu मधे व नंतर टाटा हॉस्पिटल परेल मधे उपचार चालू होते जवळ जवळ ९ महिने chemotherpy ची अवघड उपचारपद्धती व या दरम्यान १४ वेळा रक्त व १५ वेळा पांढरा पेशींची(plateletes) गरज तिला पडली अशा कठीण परिस्थिती मधे दहावीची परीक्षा देणारच असे दिव्याचे म्हणणे होते.
या आजारपणात तिला शाळेत जाता आले नाही फक्त परीक्षेआधी १५ दिवस क्लासला उपस्थित राहून व कधी घरी तर कधी दवाखान्यात अभ्यास केला. परीक्षा चालू झाली दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे दिव्याला शेवटच्या ३ पेपर च्या वेळी नागीण ( herpes zoster) ची लागण झाली अशा प्रकारे २ कठीण आजारांवर उपचार चालू असताना दिव्याने दहावीत………… टक्क्यांनी घवघवीत यश मिळवले.