Wednesday, February 26 2020 9:01 am

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच खुशखबर  देतील. औरंगाबादचं नाव कधीही संभाजीनगर होऊ शकतं, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. याविषयी बोलताना खैरे यांनी हा दावा केला आहे. नामांतराची ही मागणी मूळ शिवसेनेची आहे. मात्र ती हायजॅक करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकर खुशखबर  देतील, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे..
यावेळी खैरे म्हणाले की, राष्ट्रवादीत देखील संभाजी महाराजांना मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे त्यांचाही यासाठी विरोध नसेल. उद्धव ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भात माहिती घेत आहेत, अशी माहिती देखील चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.