Tuesday, June 2 2020 3:07 am

ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी आपट्याची पाने वाटून केला प्रचाराचा शुभारंभ

ठाणे :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मतदारांच्या घरोघरी जाऊन आपट्याची पाने वाटत ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी प्रचाराचा अनोखा शुभारंभ केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली असताना मतदार राजाला सोने वाटून पाचंगे यांनी दिलेल्या शुभेच्छा ही त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी लॅपटाॅप, मोबाईल, फेसबुक, ट्विटर या प्रचाराच्या आधुनिक शस्ञांचे पूजन करुन त्यांनी या
विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ वाढवला.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पदयाञा, रोड शो, चौकसभा घेताना सर्वसामान्य मतदारांशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा संवाद तुटला आहे. या व्यवस्थेवर माञा शोधत ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी मतदारांमध्ये मिसळून त्यांना दसर्‍याचे सोने वाटले. त्यांना भविष्यातील त्यांच्या मनातील विकासाचा अजेंडा समजावून सांगितला. दरम्यान, आज दसर्‍यानिमित्त होणार्‍या शस्ञपूजनाच्या मुहूर्तावर पाचंगे यांनी लॅपटाॅप, मोबाईल, फेसबुक, ट्विटर या प्रचाराच्या आधुनिक साहित्यांचे मनोभावे पूजन केले. काळाच्या ओघात शस्ञांचे स्वरुप बदलले असले तरी विरोधकांशी आमचे युध्द कायम आहे. ही आधुनिक शस्ञे दुधारी असून येत्या काही दिवसात या शस्ञांचा वापर करुन विरोधकांशी लढा दिला जाणार असल्याचे मत ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले.