Monday, January 27 2020 9:39 pm

ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता उदयनराजेंचा भाजप प्रवेश;नवाब मलिक

मुंबई :-  ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी घणाघाती टीका  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. आज राष्ट्रऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता वादी  काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना रामराम करत भाजपा मध्ये प्रवेश केला.  शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल. त्यांना १९९९ च्या पराभवाची त्यांना आठवण करून देऊ. ते कुठल्या पद्धतीने कामे करतात. रात्री व दिवसा कुठल्या अवस्थेत असतात, हे सातारा जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी ती जागा आम्ही निवडून आणू, असा दावाही त्यांनी केला.

भारतातील राजे, संस्थानिक यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही माणसे सोडली आहेत. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत. स्वतःसाठी वापरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहे. उदयनराजे हे सुद्धा याच आमिषाने भाजपमध्ये गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी अबाधित राहिल्या पाहिजेत. त्यामुळे उदयनराजे जेव्हा केव्हा ते निवडणूक लढवतील तेव्हा आम्ही त्यांना पराभूत करू, असं ते म्हणाले.