Sunday, December 16 2018 5:38 am

एसबीआयच्या एटीएम धारकांना दिलासा !

स्टेट बँके ऑफ इंडियाच्या एटीएम धारकांवर याआधी एटीएममधून स्वतःचेच पैसे काढताना विविध अडचणीना सामोरे जावे लागत होते . परंतु आता हा त्रास दूर होणार आहे . आता स्टेट बँके ऑफ इंडियाचे एटीएमधारक अनलिमिटेड मनी ट्रान्जॅक्शन करु शकतील. पण अनलिमिटेड ट्रान्जॅक्शनसाठी बँकेच्या काहीशा मूळ अटींचे पालन करणे गरजेचे राहणार आहे, हि आनंदाची बातमी स्टेट बँके ऑफ इंडियामधील अकाऊंट धारकांना असणार आहे.

रिजर्व बँकेने एसबीआयला आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांच्या ग्राहकांना दर महिन्याला काही ठराविक वेळा फ्री आणि अनलिमिटेड ट्रान्जॅक्शनची सुविधा उपलब्ध करुन द्यायला हवी. यापूर्वी एसबीआयने एटीएममधून दिवसाला पैसे काढण्याची मर्यादा हि ४० हजारांवरुन २० हजार इतकी घटवली होती, सध्या एसबीआयचे ग्राहक दरमहा आठ वेळा एटीएम ट्रान्जॅक्शन करु शकतात. त्यापैकी पाच वेळा ग्राहकांना एसबीआयची एटीएम मशीन वापरावी लागते, तर तीन वेळा ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ट्रान्जॅक्शन करु शकतात.अनलिमिटेड ट्रान्जॅक्शनसाठी बँक अकाऊंटमध्ये दर महिन्याला सरासरी एक लाख रुपये ठेवणे बंधनकारक आहे. त्यानंतरच ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप म्हणजेच SBG च्या एटीएम कार्डद्वारे अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करु शकतात.