Tuesday, April 23 2019 9:42 pm

एसटी महामंडळ आणि संघटनांची बैठक निष्फळ, संप सुरुच

मुंबई :पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्या अनुषंगाने एसटी महामंडळाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी संघटनांमध्ये बैठक शनिवारी बोलवली होती मात्र ती बैठक निष्फळ ठरली आहे ह्या बैठकीत संपाबाबत कुठलाही तोडगा काढल्याचे दिसून येत नाही आहे.  कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि दिवाकर रावते यांच्यात लवकरच बैठक होणार असल्याचे समजते.

अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं.निलंबित झालोत तरी संप सुरुच ठेऊ, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शिवशाही बस आणि शिवसेना प्रणित वाहतूक संघटनेकडून मात्र वाहतूक सुरु आहे.  हे कामबंद आंदोलन अद्यापही सुरुच आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या बस डेपोमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत.