Monday, June 1 2020 1:54 pm

एसटी कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही – हरी माळी

ठाणे- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लाल परी बंद करून खाजगीकरणाचा घाट घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्यांच्या गैरकारभारावर लक्ष ठेऊन आहे. एसटी कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही, वेळ पडलीच तर मनसे ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल, अस इशारा सन्घटनेचे अध्यक्ष हरी माळी यांनी दिला.
  सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हरी माळी यांनी एसटीचे खाजगीकरण , सुरु असलेले भ्रष्टचार, कामगारांचा नाहक होत असलेला छळ या विरोधात मनसेची भूमिका स्पष्ट करताना बोलत होते.
  १९ हजार गाड्या असलेली देशातील सर्वात मोठी परिवहन सेवा ७० वर्षाची झाली. येथे २० वर्षांपासून शिवसेनेची युनियन आहे. शिवसेनेच्या कारभाराला कंटाळलेले कामगार या युनियनपासून दुरावू लागले आहे. ती टिकविण्यासाठी दिवाकर रावते मनसे समर्थक कामगारांना नाहक देत असल्याचा आरोप श्री. माळी यांनी पत्रकार परिषदेत केला. उत्पदनात पडलेला खड्डा भरण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून कोट्यवधीची अवाजवी आणि शंकास्पद बिले अदा करण्याचा सपाटा श्री. रावते यांनी लावला आहे. जुन्या एसटीचे लाल डबे बदलून आहेत ते पार्ट वापरून त्या रस्त्यावर आणण्याचा घाट घातला जात आहे. रायगड मध्ये अशा १०० एसटी बसेस रस्त्यावर आणण्यात आल्या आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शिवशाही बसचे सर्वात जास्त अपघात झाले असून त्या विरोधात मनसेने आवाज उठवला, मात्र परिवहन मंत्री टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा संताप श्री. माळी यांनी व्यक्त केला.
 अनेक जिल्ह्यात लालपरीचा रंग बदलण्याचे काम सुरु आहे. एसटीच्या आगाराचे काम गरज नसताना काढले जात आहे. कामगारांना आणि प्रवाशांना आगारात मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात असून एसटीच्या जागा ऐकण्याचा आणि खाजगीकरणाचा एकमेव अजेंडा राबवला जात आहे. एसटीच्या हजारो कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही. मनसेची कामगार सेने एसटीचे खाजगीकरण हणून पाडेल,प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारला सळो कि पळो करून सोडेल असा इशाराच हरी मला यांनी पत्रकार परिषदेत दिला .