ठाणे ०९ : क्लस्टरने एसआरएमध्ये घुसखोरी केल्याने शहराच्या विविधभागांतील एसआरएचे सुमारे २१ प्रकल्प रखडले आहेत. ठाणे महापालिकेला यातून मिळणारे सुमारे ७० ते ८० कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळू शकलेले नाही. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यातील सदनिका विक्रीतून महापालिकेला मिळणाऱे मुद्रांक शुल्क मिळालेले नाही.
एसआरए अंतर्गत शहराच्या विविध भागांतील गृहप्रकल्पातून झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर मिळते.
मागील काही वर्षांत एसआरएच्या माध्यमातून शहरातील २१ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यातील सहा प्रकल्पांना सीसी देण्यात आलेली आहे. १६ प्रकल्प हे अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वच प्रकल्पांना महापालिकेच्या क्लस्टर योजनेचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन हा तिढा सोडविण्याची मागणी केली.