Monday, June 1 2020 2:23 pm

एवढ्या पाच महिन्यात उदयनराजेंच्या संपत्तीत दीड कोटींची वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप मध्ये प्रवेश करणारे सातारा लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार उदयन भोसले यांच्या संपत्तीत अवघ्या पाच महिन्यांमध्ये दीड कोटी रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे. उदयन भोसले यांच्या सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची तपशील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या खासदार पदाचा राजीमाना दिल्यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयन राजे आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यात लढत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रात १३ कोटी८१ लाख मालमत्ता होती. त्यानंतर भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात १४ कोटी ४४ लाखांपेक्षा जास्त मालमत्ता समोर आली आहे.