Tuesday, April 23 2019 9:26 pm

एलपीजीचा टँकर उलटला अनर्थ टळला – वाहतुकीचा चक्का जाम

ठाणे :वसईच्या दिशेने निघालेला एलपीजी टँकर मंगळवारी पहाटे घोडबंदर रोडवरील काजूपाडा परिसरातील रस्त्यावर र अचानक उलटल्याने एकाच खळबळ उडाली. टॅंकरमधील गैस गळती होऊन दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वेळीच गळतीवर उपाययोजना करून आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने त्वरित मदत कार्य केल्याने अनर्थ टळला. या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकारी यांनी दिली.  दरम्यान रस्त्यात टँकर उलटल्याने वाहतुकीचा चक्काजाम  झाला. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी सुटली. 
 
                मंगळवारी पहाटे ५-३० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरून निघालेला एलपीजी भरलेला टॅंकर हा काजूवाडी परिसरात आला असता वळणावर तो उलटला. भरलेला टँकर असल्याने गैस गळती होऊन दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामीण रहिवाशांनीही मदतकार्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक व स्थानिक पोलीस यांनी त्वरित मदतकार्य केले. या दरम्यान सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीचा चक्काजाम होता. गैस गळती आटोक्यात आणल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. सकाळी ८ वाजण्याच्या सुरमारास वाहतूक कोंडीचे कडे सुटले आणि वाहतूक सुरळीत झाली.