Monday, January 27 2020 1:57 pm

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा आज शिवसेनेत प्रवेश

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रदीप शर्मा यांच्या हाती शिवबंधन बांधले.  आम्ही कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढत असतो. त्यामुळेच चांगली लोकं आमच्याकडे येत आहेत. अजून बरेच लोक शिवसेनेत यायचे बाकी आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  मीडियाशी संवाद साधतना  स्पष्ट केले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे नालासोपारा येथून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता. पोलीस दलात असताना कोणतीही अडचण आली की मी त्यांना भेटायचो. ते आमचे प्रश्न सोडवायचे. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सामाजिक कामं केली. आता शिवसेनेसारख्या मोठा राजकीय प्लॅटफॉर्म काम करण्याची संधी मिळत असून त्याचं सोनं करणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.