Sunday, September 15 2019 4:02 pm

एड्सविषयी जाणून घ्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरीतून दिला संदेश

ठाणे : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक संस्था, शासकीय  रुग्णालये, विद्यालयातून एड्सबाबत जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा सामान्य  रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय- जांभळी नाका- टेंभी नाका- या मार्गाने फेरी पुन्हा रुग्णालयात आली. युवक व एच.आय.व्ही.ग्रस्तासांठी सेवा सुविधा, एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम आदी मुद्यांवर या फेरीत फलक होते. फेरीत सुमारे ५०० मुले सहभागी झाले होते.

याप्रसंगी एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना मोफत बस प्रवास योजनेखाली ३ जणांना पासेस देण्यात आले.

बांदोडकर , एनकेटी, ज्ञानसाधना, आर जे ठाकूर, सुशीलादेवी देशमुख, परिचारिका प्रशिक्षण केंद्र यामधील विद्यार्थ्यांनी या फेरीत सहभाग घेतला.

शेट्टे व्हिजन ग्रुपमार्फत यावेळी एक पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रसन्न देशमुख, बाह्य अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ अविनाश भागवत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांनी एड्स आजाराविषयी मार्गदर्शन केले  व एड्सविषयी समज, गैरसमज याची माहिती सांगून रुग्णांना माणुसकीची वागणूक देण्याची गरज व्यक्त केली. योग्य उपचार, व्यायाम, आहार यामुळे रुग्णांचे आरोग्य संतुलित राहु शकते असे त्यांनी सांगितले.