Tuesday, July 7 2020 1:57 am

महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा;एक्झिट पोलचा अंदाज

मुंबई :- विधासभा निवडणुकीच्या २८८ जागांवर मतदान पूर्ण झाले असून महाराष्ट्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले. 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेनेला 204 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 69 जागा मिळाल्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना 15 जागा मिळू शकतात. आजच सगळय़ा उमेवादारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. या एक्झटिपोलनुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळतील, आघाडीला 55 ते 81 जागा मिळतील इतर पक्षांना 4 ते 21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.