Friday, December 13 2019 7:39 am

एकाच दिवशी काँग्रेसच्या तीन नेत्यांचा राजीमाना

मुंबई : एकाच दिवशी काँग्रेसच्या तीन नेत्यांनी राजीमाना दिल्याने  काँग्रेसचे हाल बेहाल झाले आहे. ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील,  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या बरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस ला रामराम  ठोकावला आहे. माजी मंत्री कृपाशंकर सिंह हे भाजपा मध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याचे  समजत आहे. उद्याच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यांनी काँग्रेसच्या छाननी समितीत ही नाराजी व्यक्त करतानाच ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची कर्नाटक भवनमध्ये भेट घेऊन त्यांची नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिला.