Tuesday, July 23 2019 2:12 am

एकजूट राखा- राज ठाकरे

मुंबई -: बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आता मनसेकडे धाव घेतली आहे. मनसेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला असून संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राज ठाकरेंनी यावेळी कर्मचाऱ्यांना काही झालं तरी एकजूट राखा असा सल्ला दिला.

बुधवारी संप मिटवण्यासाठी मुंबई पालिकेप्रमाणे बेस्ट उपक्रमाकडून सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले. मागण्यांसदर्भात दिवसभरात बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांत सुरू असलेल्या बैठकातून तोडगा निघाला नव्हता. गुरुवारी सकाळी पुन्हा बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांमध्ये बैठक होणार आहे.