मुंबई, 14 : उर्फी जावेदप्रकरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार नोंदवली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी उर्फीची चौकशी केली. उर्फी प्रकरणात आजवर चित्रा वाघांशिवाय, माजी महापौर किशोरी पेडणेकर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली मतं दिली. अशातच आता शिंदे गटात नेत्या शीतल म्हात्रे यांनी उर्फी वादात उडी घेतली आहे. शीतल यांनी व्हिडीओ शेअर करत उर्फीवर टीका केली आहे.
शीतल म्हात्रे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे एक जबाबादारी असते. आपल्या देशात आचार विचार पोशाखाचं स्वातंत्र्य असलं तरी कुठे कोणते कपडे घालावेत याचा सत्सक विवेकबुद्धीनं विचार करून आपण निर्णय घेतो. स्विमिंग कॉस्च्युम घालून आपण स्विमिंग करायला जातो पण तेच कपडे घालून आपण देवळात जात नाही’.
शीतल म्हात्रे पुढे म्हणाल्या, ‘प्रत्येकानं हा निर्णय घ्यायचा असतो. ही सदसदविवेकबुद्धी संस्कारांनी येते. पण आता काही लोकांकडे संस्कारच नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे संत्सक विवेकबुद्धी आहे की नाही माहिती नाही.
त्यामुळे गेले काही दिवस उर्फी नावाचा नंगा नाच सुरू आहे जो आपल्या संस्कृतीला अनुसरून नाहीये. कोणत्याही आई किंवा भावाला वाटणार नाही की आपल्या बहिणीनं आपल्या मैत्रिणीनं बायकोनं असे कपडे घालून सामाजिक जीवनात फिरावं. कुठे कोणते कपडे घालावेत याचं सामाजिक भान असणं फार आवश्यक आहे’. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीक करत असा नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
उर्फी दिलेस तिथे तिचं थोबाड फोडू असं बेधडक वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. उर्फी सातत्यानं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीला अंबोली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. सार्वजनिक ठिकाणी अश्लील अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीची दीड तास चौकशी करण्यात आली.