Sunday, September 15 2019 11:13 am

उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला रामराम

मुंबई :-  अवघ्या सहा महिन्यातच  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यानी काँग्रेसला रामराम करत  पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला आहे.  १६ मे रोजी रोजी  पक्षाचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना  उर्मिला यांनी एक पत्र पाठवले होते. परंतु त्याची दाखल न घेतल्याने  पक्षातील काही नेत्यांनी सहकार्य न केल्याची उर्मिला यांची भावना होती. उलट पत्रातील गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांना पुरवण्यात आली. या साऱ्याचा वारंवार निषेध करूनही पक्षातील कोणीही माफी मागण्याची तसदी घेतली नाही. शिवाय, ज्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता, त्यांनाच जाब विचारण्याऐवजी चांगली पदे देण्यात आली,’ असा आरोप उर्मिला यांनी केला आहे.

  काँग्रेसमध्ये  राहून मला मुंबईत   व्यापक उद्दिष्टांसाठी काम करायची होती. परंतु पक्षातील काही महत्वाच्या  नेत्यांनाच रस नाही.  यापुढं पक्षांतर्गत राजकारणासाठी मला स्वत:चा वापर होऊ द्यायचा नाही. पक्षातून बाहेर पडले तरी लोकांसाठी काम करत राहीन,’ असं त्यांनी म्हटलं आहे.