Wednesday, August 12 2020 9:05 am

उरणमधील ओएनजीसी प्लांटला आग; ५ जणांचा मृत्यू

पनवेल :  ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीत ५ जण मृत्यू झाल्याची घटना उरण येथे घडली. आज सकाळी च्या सुमारास हि आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  या आगीत ५ जणांचा  मृत्यू झाला असून   तिघे गंभीर जखमी झाले आहेत तर मृत पावलेल्या मध्ये  दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे.जखमी झालेल्या कामगारांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

ही आग लिक्विड गळतीमुळे लागली आहे. आग लागली तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथं मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनेक कामगार जखमी झाले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. प्लांटमध्ये नेमके किती कामगार होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
  या आगीमुळे परिसरात घबराट पसरली असून आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी जाऊ लागले आहेत. आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेत.