Saturday, January 18 2025 5:26 am
latest

उपसभापती गोऱ्हे यांनी शिवसेना सोडल्यामुळे नैतिकदृष्ट्या पदावर बसता येणार नाही- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई 17 विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांना या पदावर बसता येणार नाही, असे मत परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद तहकूब झाल्यावर व्यक्त केले. प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. असेही दानवे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षांतर केल्याच्या बातम्या आम्ही वृत्तपत्र व विविध माध्यमांमधून ऐकल्या आहेत, त्यामुळे पक्षाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेना ( उबाठा) पक्षाच्या वतीने त्यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली होती, त्यामुळे पक्षाच्या अधिकारांतर्गत पक्षांतर केल्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. असेही दानवे यांनी सांगितले. महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आज डिस – कॉलिफिकेशनचा ठराव मांडण्यात आलेला आहे.