Monday, April 21 2025 10:47 am
latest

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिडास हॉस्पिटलचे उद्घाटन

नागपूर, 04 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिडास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.

वर्धा रोडवरील परसोडी गावा शेजारी स्थित अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिडास हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी वने, पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्री.फडणवीस आणि श्री. मुनगंटीवार यांनी या हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देवून पाहणी केली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मिडासचे प्रमुख डॉ.श्रीकांत मुकेवार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. सौरभ मुकेवार यांनी हॉस्पिटलची माहिती देत सादरीकरण केले.