Friday, January 17 2025 7:50 am
latest

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे कार्यालयाचे उद्घाटन

ठाणे, 08 – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या नूतन ठाणे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन ९ ऑगस्ट क्रांतीदिनी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे शहर(जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन ठाणे मध्यवर्ती कार्यालय, शाॅप नंबर ५, झेड विंग, फ्लॉवर वॅली काॅम्प्लेक्स, विवियाना माॅल समोर, सर्विस रोड, ठाणे (प.) येथे सुरु करण्यात येणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते बुधवारी, ९ ऑगस्ट २०२३ क्रांतीदिनी, सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी सांगितले.

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय उद्घाटनासाठी येणाऱ्या ना. अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी, ठाणे राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नित्यानंद वाघमारे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी सांगितले.