Sunday, September 15 2019 11:48 am

उद्या ३ तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय – “ट्राय”

मुंबई -: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ यांच्या नवीन नियमावलीनुसार केबल सेवेच्या दरामुळे ग्राहक आणि केबल ग्राहकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ट्राय (TRAI) ने टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नवे नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार तुम्हाला जितक्या वाहिन्या हव्या आहेत त्याच वाहिन्यांसाठी दर आकारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रायच्या नवीन नियमांसोबत केबल टीव्ही व्यावसायिकांवर जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप करत, देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी 27 डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 7 ते 10 या वेळेत केबल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केबल ग्राहकांच्या खिशातून अप्रत्यक्षरित्या अधिकचे पैसे काढण्याचे काम उपग्रह वाहिन्या करत असल्याचा आरोप केबल चालकांनी केलाय. या मुद्द्याच्या आधार आज राज्यभराल्या केबल चालकांची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत उद्या केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार आणि वकील अनिल परब यांनी केबल चालकांच्या वतीनं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केलाय.