Saturday, March 15 2025 6:55 pm

उद्यापासून रंगणार पहिल्या -वहिल्या जिल्हास्तरीय व आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचा ठाण्यात थरार

ठाणे, 02: शिवसेना पुरस्कृत जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पहिल्यांदाच ठाणे शहरात जिल्हास्तरीय व आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचा थरार येत्या ४,५,६,७,८,९ फेब्रुवारी असा पाच दिवस पाहता येणार आहे. ही स्पर्धा ठाण्यातील तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पार पडणार असून मुख्यमंत्री चषक २०२३ या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २ हजार ३०० हून अधिक कबड्डी खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष या स्पर्धेत एकूण सात लाखांची रोख बक्षीसे आणि आकर्षक चषक देवून विजेत्या खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे.
या स्पर्धेत पुरुष अ आणि ब गट, महिला गट, कुमार गट मुले- मुली तसेच आंतरशालेय १४ व १७ वर्षाखालील मुले- मुली या गटात मुख्यमंत्री चषक ही स्पर्धा संपन्न होणार आहेत. तर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला या स्पर्धेची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील या पहिल्या- वहिल्या भव्य दिव्य स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक राजा ठाकूर, उदय परमार आणि विकास दाभाडे यांनी दिली.