ठाणे, १६ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या गेले काही दिवसांपासून सातत्याने गरळ ओकत आहेत. हिंदू धर्म व हिंदू देवदेवतांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करत आहे. जैनधर्मीयांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्या आहेत. सुषमा अंधारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांच्या विरोधात सध्या समाजात तीव्र संतापाची लाट आहे. ज्या पक्षात त्या आहेत, त्या पक्षाचे सर्वेसर्वा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी म्हाताऱ्या म्हणून हिणवले होते.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण या सर्वांचा अपमान करुन खिल्ली उडविली त्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली असून वारकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. महानुभव पंथाच्या दैवताचा अपमान केल्यामुळे त्यांनी सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ व त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांचा बोलविता धनी यांच्या निषेधार्थ सर्व सामाजिक व धार्मिक संस्थांनी उद्या 17 डिसेंबर 2022 रोजी बंद पुकारला असून या बंदला पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली असून त्यांच्या बंदला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा तसेच महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा असणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
उद्या 17 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विठ्ठल मंदिर येथून निघणाऱ्या लाँगमार्च मध्ये देखील सामील होणार असलेल्या शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के व महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे यांनी नमूद केले आहे.