Sunday, August 9 2020 11:16 am

उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांची मते आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न 

नाशिक :-  मुख्यमंत्री कोणाचा होणार हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. पण शेतकरी चिडले तर सत्तेची आसने जळून खाक होतील अश्या शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री आमचाच असेल असा दावा करणाऱ्या भाजपाला शेतकरी चिडले तर सत्तेची आसने जळून खाक होतील असा टोला लगावला आहे. उद्धव यांनी शेतकऱ्यांची मते आपल्या बाजूने खेचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न  केला.

शिवसेनेच्या वतीने  शेतकऱ्याशी निगडीत असणारे पीक विमा केंद्र श्रीरामपूर येथे उघडण्यात आले. या असून  पीक विमा केंद्राचे  उद्घाटन रविवारी उद्धव ठाकरे यांनी केले. या  उद्घाटन  सोहळ्यात  मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, संजय घाडी, संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, भाऊ कोरेगावकर, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, डॉ.महेश क्षीरसागर, विजय काळे, सभापती दीपक पटारे, सेनेतर्फे श्रीरामपूर मधून निवडणूक लढवू पाहणारे खासदार लोखंडे यांचे चिरंजीव डॉ.चेतन लोखंडे , सचिन बडधे, राजेंद्र देवकर, निखिल पवार, दादासाहेब कोकणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब चिडे,संकेत संचेती हे उपस्थित होते. कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? शेतकऱ्यांनी हात उंचावून सांगावे असे आवाहन करताच शेतकऱ्यांनी नाही असे उत्तर ठासून सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करा. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना याची माहिती द्या, असे ठाकरे म्हणाले.शिवसेनेची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच लढण्याची भूमिका राहिली. पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला. इतर पक्षातील नेते आंदोलनापासून सावध भूमिका बाळगून होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कदापि करणार नाही. शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा सज्जड इशाराही उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला दिला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार लोखंडे यांना सलग दुसऱ्यांदा विजयी केल्याने मी येथील मतदारांचा ऋणी आहे. सेनेचे खासदार,आमदार आणि पदाधिकारी यांनी जनतेच्या दारापर्यंत जा आणि ज्यांनी सत्ता मिळवून दिली त्यांचे अश्रू पुसायला तत्पर राहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेने सत्तेत राहूनही कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड केली नाही. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी याला आमची प्राथमिकता होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्याकरिता संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा केला. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील.