Sunday, September 15 2019 3:57 pm

उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

मुंबई :- उत्तर मुंबई मतदारसंघातून  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पिछाडीवर असल्याचे चित्र दिसतंय तर  उत्तर मुंबईतील भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे प्राथमिक कलांनुसार आघाडीवर आहेत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान दिले होते.
 उत्तर मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून   तिकीट देण्यात आले. गोपाळ शेट्टी विरुद्धात उर्मिलानं मोर्चेबांधणी केली खरी परंतु, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांच्या कलांनुसार ती पिछाडीवर आहे. उर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्यापैकी कोण जिंकणार हे मात्र येत्या काही तासांत स्पष्ट होईल.
 अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी ‘विजेता कोण?’ हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.