Thursday, January 24 2019 6:02 pm

उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा गारपीटाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण,23 फेब्रुवारीदरम्यान, उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.गेल्या आठवडय़ात मराठवाडय़ासह विदर्भात गारपीटीने थैमान घातले होते. जालना जिह्याला या गारपीटीचा सर्वाधिक फटका बसला होता. 11 जिह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामध्ये गहू,हरभरा,ज्वारी,कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने गारपीटीचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱयांनी पिकांची काळजी घ्यावी,पिकं उघडय़ावर सोडू नये,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.