Tuesday, July 23 2019 1:51 am

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम !

 नवी मुंबई-: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे कोकण विभागातील जिल्हयांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने या जनजागृती मोहिमेदरम्यान वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व अधिकारी/कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत कोकण विभागातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जास्तीत जास्त माहिती प्राप्त करावी असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी विभागातील सर्व मतदारांना केले आहे.