Monday, January 27 2020 2:12 pm

इनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

ठाणे :  ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आणि इनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी आपल्या नौकरीच्या राजीनामा गृहविभागाचे उपसचिव व्यंकटेश भट यांनी आज मंजूर केला. प्रदीप शर्मा यांनी अद्याप पर्यंत कुठल्या पक्षातून निवडणूक लढविणार हे स्पष्ट केलेलं नाही. मात्र प्रदीप शर्मा हे शिवसेनेत दाखल होणार असल्याची विश्वसनीय चर्चा आहे.
       ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी सेवा मुक्तीचा राजीनामा गृह विभागाला दिला होता. पुढील राजकीय वाटचालीसाठी प्रदीप शर्मा हे राजीनामा मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. गृहविभागाने त्यांनाच राजीनामा कालपर्यंत मंजूर केला नव्हता मात्र अखेर प्रदिप शर्मा यांचा राजीनामा मंजूर झाला. १९८३ साली पोलीस सेवेत दाखल झालेले प्रदीप शर्मा हे मुंबई गुन्हे शाखेत कायम आघाडीवर राहिले त्यांनी घाटकोपर आणि माहीम पोलीस ठाण्यातच केवळ सेवा बजावली. त्यांनी मुंबईत उसळलेल्या गॅंगवॉरचा खात्मा करण्यात चकमक विशेषज्ञामध्ये प्रदीप शर्मा हे एक नाव आघाडीवर आले होते. त्यांच्या नावावर तब्बल १०३ चकमकीत गुंड मारल्याची नोंद आहे. चकमकीत अग्रेसर असलेल्या सहर्म यांच्यावर खोट्या चकमकीचा कलंक लेखन भैय्या या चकमकीनंतर लागला. यात त्यांना सस्पेंड व्हावे लागले. काही काळ कारावासही भोगावा लागला. अखेर क्लीनचिट  न्यायालयाद्वारे घेऊन  पुन्हा पोलीस सेवेत ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळला.
          प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर करणारे गृह उपसचिव व्यंकटेश यांनी अटी  आणि शर्थीवर राजीनामा मंजूर केली आहे. लखन भैय्या चकमकीत न्यायालयाने क्लीनचिट दिली असली तरीही उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्याच्या अंतिम निर्णयापर्यंत प्रदीप शर्मा याना त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ घेता येणार नाहीत. चकमक फेम म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या १०३ चकमकीपैकी लेखन भैय्या चकमक त्यांच्या कारकिर्दीवर कालिंक लावून गेली. अखेर त्यानी राजकीय वाटचालीचा निर्णय घेतला आणि आगामी निवडणुकीत ते शिवसेना पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.