Sunday, March 24 2019 12:14 pm

इथोपियामध्ये विमान कोसळलं, 157 प्रवाशींसह, 4 भारतीयांचा मृत्यू

अदिस अबाबा : – इथोपियाची राजधानी आदिस  अबाबा वरून नैरोबी साठी उड्डाण करणारे  ‘ इथिओपियन  एअरलाइन्स ‘ च्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे.  उड्डाणानंतर सहा मिनिटांत विमानाचे नियंत्रण कक्षाशी  संपर्क तुटल्याने विमान खाली कोसळले. या भीषण अपघातात विमानातील १५७ प्रवाश्यांचा मृत्यू झाला.  यात १४९ प्रवासीसह ८ कर्मचारी यांचा समावेश आहे. व मृत्यु पावलेल्या प्रवाश्यांमध्ये ४ भारतीयांचा देखील समावेश आहे. शिखा गर्ग, अन्नागेश वैद्य,  मनिषा नुकवरपु अशी या मृत भारतीय नागरिकांची नावे असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटर द्वारे सागितले. या विमानामध्ये एकुण ३३ देशांचे प्रवासी प्रवास करत होते.विमानात काही तरी बिघाड आहे असे सांगत विमान परत वळवण्यासाठी वैमानिकांनी परवानगी मागितली होती. मात्र आदीस अबाबा येथून काही अंतरावर बिशोफ्तु शहराजवळ विमानाचा अपघात झाला.