Sunday, September 15 2019 11:05 am

चक्क मनसेने पाठवली ईडीला नोटीस

मुंबई –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी ने नोटीस बजावल्यानंतर  गुरुवारी ईडीने तब्बल साडेआठ तास राज ठाकरे यांची जोरदार चौकशी केली त्यानंतर आता चक्क मनसेनेच ईडीला नोटीस पाठवली आहे.

महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरलं आहे पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे,आणि ह्या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार?  असे मनसेने यासंर्दभात ट्विट करत म्हणटले.

कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. सकाळी 11.30 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरु झाली होती. राज ठाकरेंनी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर चौकशीनंतर रात्री 8.15 च्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यानंतर कुटुंबासह राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. त्यावेळी घराबाहेर अनेक मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. या उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी सांगितलं की, ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली.