Friday, October 30 2020 4:13 pm

इगतपुरी येथील भावली धरण पर्यटनाच्या दृष्टीने प्रगत करण्याचा मानस – जलसंपदामंत्री जयंत पाटील

नाशिक  : इगतपुरी येथील भावली धरणात बोटिंग सुरू करून व इतर सुविधा आणून पर्यटनाच्यादृष्टीने हा भाग प्रगत करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आज नाशिक जिल्हयाचा दौरा असून यामध्ये जलसंपदा विभागाचे प्रश्न आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट असा कार्यक्रम आहे.

आज सकाळी इगतपुरी येथील भावली धरणाला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे धरण वसलेले असून अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी इथे भेट देत असतात त्याअनुषंगाने या धरण भागात पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

इगतपुरी येथे बरीच प्रेक्षणीय स्थळेही आहेत. धबधब्यांचे चांगले सुशोभीकरण करता येऊ शकते असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पांडुरंग बरोरा उपस्थित होते.