Thursday, November 15 2018 1:36 pm

इक्बाल कासकर ला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांचे निलंबन

ठाणे : ठाणे कारागृहात सध्या जेरबंद असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. खंडणीच्या प्रकरणात अटकेत असलेला इक्बाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहात इकबाल कासकर जेरबंद आहे त्याच्या नियमित वैद्यकीय तपासणीकरिता त्याला गुरुवारी ठाणे सिव्हिल रुग्णालयात आणले होते ह्यावेळी त्याला रोहिदास पवार आणि त्यांच्या टीमच्या वतीने त्याला गाडीत बिर्याणी देण्यात आली.त्यामुळे कासकरला ठाणे कारागृहातून ते रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढत निलंबनाची कारवाई केली.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.